bank atm if you get torn note from atm then dont worry do this

ATM मधून पैसे निघालेच नाही, पण खात्यातून पैसे कापले गेले, अशा वेळी काय करायचं? जाणून घ्या…

अर्थकारण देश

नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात एटीएम मशीनचा वापर आता सामान्य झाला आहे. परंतु, कधीकधी या मशीनमध्ये बिघाड होतो आणि पैसे बाहेर येत नाहीत, पण खात्यातून मात्र पैसे कापले जातात. अशा परिस्थितीत, आपण खूप अस्वस्थ होतो आणि काय करावे हे समजत नाही. RBI च्या नियमांनुसार, अशा स्थितीत बँक आपोआप तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत करते. याला तीन दिवस लागू शकतात. कधीकधी बँकेच्या तीन दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या लागू शकतात. तथापि, अशा स्थितीत तुम्ही तुमच्या बँकेला फोन करून याविषयी माहिती देणे कधीही चांगले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ATM मशीनमुळे ग्राहक आणि बँक दोघांनाही सुविधा मिळते. मशीनमध्ये काही बिघाड झाल्यास ही संपूर्णपणे बँकेची जबाबदारी आहे, कारण बँकच ATM मशीन चालवित असते. जर तुम्ही ATM मधून पैसे काढले आणि मशीनमधून पैसे निघालेच नाही, पण तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले, तर तुम्ही बँकेला फोन करून त्याबद्दल तक्रार करू शकता. जर तुम्हाला तुमच्या बँकेचा नंबर आठवत नसेल, तर एटीएम मशीनच्या आजूबाजूला नजर टाका, तुम्हाला काही हेल्पलाईन क्रमांक दिसतील. या क्रमांकावर कॉल करा आणि कापलेल्या पैशांची माहिती द्या.

बँकेने जर तुम्हाला 5 दिवसांच्या आत पैसे परत केले नाहीत, तर तुम्ही भरपाईचे हक्कदार व्हाल. तुमचे कार्ड जारी करणाऱ्या बँकेला तुमची रक्कम पुन्हा जमा करण्यास विलंब झाला तर प्रतिदिन 100 रुपये भरपाई द्यावी लागेल. ग्राहकाने कोणताही दावा केला नाही तरीही भरपाई ग्राहकाच्या खात्यात जमा करावी लागेल. तथापि, जर बँकेने पैसे आणि भरपाई दिली नाही तर ग्राहक त्याच्या बँकेशी संपर्क साधू शकतो. ग्राहक बँकेकडून उत्तर मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत किंवा बँकेकडून उत्तर न मिळाल्यास 30 दिवसांच्या आत बँकिंग लोकपालाशी संपर्क साधू शकतो.

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग लोकपाल कार्यालयाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही https://rbi.org.in/Scripts/AboutUsDisplay.aspx?pg=BankingOmbudsmen.html वर क्लिक करू शकता किंवा ऑनलाईन तक्रार https://cms.rbi.org.in/cms/IndexPage.aspx?aspxerrorpath=/cms/cms/indexpa वरही करता येते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत