Two people fell as plane took off from kabul airport
ग्लोबल

भयंकर VIDEO : काबुल सोडण्यासाठी लोकांनी स्वतःला विमानाच्या चाकांना बांधून घेतले, टेक-ऑफ नंतर खाली कोसळले…

काबूल : तालिबानने देश ताब्यात घेतल्याने अफगाणिस्तान सोडण्यासाठी हजारो अफगाणी नागरिक काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमा झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये अराजकतेचे वातावरण आहे. काबूलमध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. इथल्या प्रत्येक परदेशी व्यक्तीला बाहेर जायचे आहे. यामुळेच काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी जमली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काबूल विमानतळ सध्या अमेरिकी सैन्याच्या ताब्यात आहे, पण प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. कोणतीही सुरक्षा तपासणी चालू नाही. लोक विमानात चढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काही जणांनी टेक-ऑफ दरम्यान स्वतःला विमानाच्या चाकांवर बांधून घेतले होते. टेक-ऑफ नंतर काही वेळाने हे लोक खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या लोकांचे मृतदेह आता छतांवर सापडत आहेत.

तेहरान टाइम्सने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काबुलवर एक विमान उडताना दिसत आहे. तसेच या विमानातून दोन लोक खाली पडताना दिसत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत