देहरादून : उत्तराखंडमधील उधम सिंह नगरमधून मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील किच्छा येथे चुलत भावानेच आपल्या तीन वर्षांच्या बहिणीवर बलात्कार करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी तीन वर्षांची चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती. तिचे वडील खासगी शाळेच्या बसचे चालक असून आईही मजूर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला मुंबई न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई : एका १३ वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप असलेल्या एका महिलेला मुंबईतील विशेष पॉक्सो न्यायालयाने जामीन मंजूर केला. अतिरिक्त संयुक्त विशेष न्यायाधीश अनिस खान यांनी नमूद केले की, ज्या प्रॉपर्टीमध्ये गुन्हे घडले आहेत ती आरोपी महिला यास्मिन मोहम्मद हुसेन हिची नाही आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला तिचा पती याआधीच जामिनावर सुटला आहे. त्यांनी […]
माटुंगा रेल्वे स्थानकावर दोन एक्स्प्रेसची धडक, तीन डबे रुळावरून घसरले…
मुंबई : माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला आहे. एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. दोन ट्रेन समोरासमोर आल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गाडी क्रमांक ११००५ मुंबई दादर–पुडुचेरी चालुक्य एक्स्प्रेस या एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. आज रात्री १०.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. दादर-पुडुचेरी […]
पुणे : पीएमपीएमल बसमध्ये प्रवाशांना लुटणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी गजाआड
पुणे : पीएमपीएमल बसमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुन्हेगारांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ७ एप्रिल रोजी पोलिसांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तडीपार गुन्हेगारांची टोळी रिक्षा क्रमांक एमएच/12/ एनडब्ल्यु/3933 सह पुणे स्टेशन बस स्टॅन्ड परिसरात चोरी करण्यासाठी येणार आहेत. त्याप्रमाणे या बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याकरीता युनिट-1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठांनी […]
6 नराधमांनी केले भयंकर कृत्य, मुलीवर बलात्कार करून सुटकेसाठी तिच्यासमोर ठेवली भयंकर अट
रांची : झारखंडमधील रांचीमध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. येथे 6 नराधमांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिच्या मैत्रिणीला बोलावून घेतले आणि तिलादेखील वासनेची शिकार बनवले. शुक्रवारी पोलिसांनी पाच गुन्हेगारांना अटक केली, तर सहावा गुन्हेगार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुपुडाणा परिसरात राहणारी तरुणी तिच्या मेहुण्याच्या घरी गेली होती. गुरुवारी रात्री […]
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले रुग्णालयात दाखल, अचानक बिघडली प्रकृती
सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गायिका आशा भोसले आपल्या मुलासोबत दुबईत आहेत, आनंद पूर्णपणे बरा होईपर्यंत त्या तिथेच राहणार आहेत. आनंद यांना गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्या भेडसावत होत्या, […]
धक्कादायक! सासऱ्याने 42 वर्षीय सुनेवर झाडली गोळी, वेळेवर नाश्ता न दिल्याने केले भयंकर कृत्य…
ठाणे : ठाण्यातील राबोडी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. राबोडी येथील 76 वर्षीय काशिनाथ पाटील यांनी गुरुवारी सकाळी आपल्या 42 वर्षीय सुनेवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. सासऱ्याला वेळेवर नाश्ता न दिल्याने त्याला राग आला आणि त्याने थेट सुनेच्या पोटात गोळी झाडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काशिनाथ पाटील यांचा वाळूचा व्यवसाय आहे. सीमा राजेंद्र […]
विधवेने वृद्ध सासूची काळजी न घेतल्यास अनुकंपा नियुक्ती रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या आठवड्यात स्थानिक जिल्हा परिषदेला आदेश दिले की एका विधवेने अनुकंपा नियुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जावर विचार करा, परंतु, त्यासाठी त्या विधवेने ती आपल्या वृद्ध सासूची योग्य काळजी घेईल असे प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून द्यायला हवे. तिने तसे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तिच्या अर्जावर विचार करावा. या विधवेचे नाव उषा गिरी आहे. न्यायमूर्ती […]
धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर प्रकरण : उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे पालन होणार का?
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने 2016 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्रात मशिदींसह धार्मिक स्थळांवर लावलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता हिंदू जनजागृती समिती (HJS) या संघटनेने या निर्णयाचे पालन करण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. नवी मुंबईतील […]
पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, मॅनेजरला अटक करून सहा मुलींची सुटका
पुणे : औंध येथे ओरा स्पा आणि मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकरीता परराज्य तसेच परदेशातील मुली ठेवून, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवुन घेतला जात होता. याविषयी १२ एप्रिल रोजी सामाजिक सुरक्षा विभागाला खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानंतर वरीष्ठांच्या आदेशाने बातमीची खातरजमा करुन, त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे बनावट ग्राहकाला पाठवून […]










