Offensive work in the spa center

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, मॅनेजरला अटक करून सहा मुलींची सुटका

पुणे महाराष्ट्र

पुणे : औंध येथे ओरा स्पा आणि मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकरीता परराज्य तसेच परदेशातील मुली ठेवून, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवुन घेतला जात होता. याविषयी १२ एप्रिल रोजी सामाजिक सुरक्षा विभागाला खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानंतर वरीष्ठांच्या आदेशाने बातमीची खातरजमा करुन, त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्याप्रमाणे बनावट ग्राहकाला पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकुन, स्पा सेंटरचा मॅनेजर सागर श्याम पवार (वय-३२, रा. गवळीवाडा, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. तर मनिष ईश्वर मुथा (रा. कोंढवा, पुणे आणि राहुल जिगजिनी या आरोपींचा शोध सुरु आहे. वरील आरोपी या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली स्वत:च्या आर्थिक फायद्याकरता महिलांकडून जबरदस्तीने वेश्यागमन करवुन घेत होते. त्यांच्या ताब्यातील दोन परराज्यातील भारतीय महिलांची व थायलंड देशातील अशा एकुण सहा महिलांची सुटका केली आहे.

पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचुन टाकलेल्या छाप्यात एकूण 81, 890 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून, नमुद आरोपींविरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, भा.दं.वि. कलम 370, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उप निरिक्षक सु्प्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, अश्विनी केकाण, स्नेहा धुरी यांच्या पथकाने केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत