Tadipar gang of robbers arrested for robbing passengers in PMPML bus
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : पीएमपीएमल बसमध्ये प्रवाशांना लुटणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी गजाआड

पुणे : पीएमपीएमल बसमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुन्हेगारांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ७ एप्रिल रोजी पोलिसांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तडीपार गुन्हेगारांची टोळी रिक्षा क्रमांक एमएच/12/ एनडब्ल्यु/3933 सह पुणे स्टेशन बस स्टॅन्ड परिसरात चोरी करण्यासाठी येणार आहेत. त्याप्रमाणे या बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याकरीता युनिट-1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठांनी आदेश दिले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे ते पुणे स्टेशन परिसरात फिरत असताना पुणे स्टेशन बस स्टॅन्ड येथे त्यांना संशयित रिक्षा नंबर दिसुन आली. त्यानंतर त्यांनी या रिक्षाला घेराव घालुन रिक्षातील व्यक्ती सर्फराज दत्तु गायकवाड (वय ४१, रा. सर्वोदय कॉलनी, म्हसोबा मंदिरा जवळ, आनंदनगर, मुंढवा, पुणे), योगेश गणेश माने (वय 40, रा. स.नं. 94, सर्वोदय कॉलनी, प्रकाश प्रोव्हीजन स्टोअर्स मागे, मुंढवा) यांना रिक्षासह ताब्यात घेतले. त्यांना पुण्यातील गुन्हे शाखा युनिट 1, कार्यालय येथे घेवुन आले. त्यांना विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांनी आरोपी अमित नाना चव्हाण (वय 26, रा.स.नं. 131, समतानगर, गोसावी वस्ती, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे), संतोष शरणाप्पा जाधव, (वय ३७, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), राजेंद्र ऊर्फ फांदेबाज ज्ञानेश्वर थेऊरकर, (वय 42, रा. पाण्याच्या टाकीमागे, गायरान वस्ती, केशव नगर, मुंढवा) यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरच्या आरोपींवर यापुर्वी गुन्हे दाखल असुन तडीपार संतोष जाधववर पुणे शहरात 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी या गुन्हेगारांकडे तपास केला असता, ते एकत्रितपणे पुणे शहरात फिरुन महिलांच्या हातातील बांगडया कट करुन गुन्हे करतात, नमुद गुन्हेगार बस मधुन प्रवास करताना गर्दीचा फायदा घेवुन महिलांच्या जवळील पर्स तसेच अंगावरील दागिने चोरतात, तसेच हातातील बांगडया कटरच्या सहाय्याने कट करुन चोरतात. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे कडील 3 गुन्हे, डेक्कन पोलीस ठाणेकडील 2 गुन्हे आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे, असे 7 चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केलेले आहेत. त्यांच्याकडुन एकुण 6,85,000 रुपये किंमतीचे 143.75 ग्रॅम सोन्याच्या पाटल्या व मंगळसुत्र तसेच एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-1 कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशीकांत दरेकर, विजेसिंग वसावे, अशोक माने, अय्याज दड्डीकर, सतिश भालेकर, इम्रान शेख, अजय थोरात, अमोल पवार, तुषार माळवदकर, अजय जाधव, महेश बामगुडे , मिना पिजंण, रुक्साना नदाफ यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी करीत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत