रांची : झारखंडमधील रांचीमध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. येथे 6 नराधमांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिच्या मैत्रिणीला बोलावून घेतले आणि तिलादेखील वासनेची शिकार बनवले. शुक्रवारी पोलिसांनी पाच गुन्हेगारांना अटक केली, तर सहावा गुन्हेगार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुपुडाणा परिसरात राहणारी तरुणी तिच्या मेहुण्याच्या घरी गेली होती. गुरुवारी रात्री मेहुण्याने मुलीला मुलासह घरी पाठवले. वाटेत मुलाने त्याच्या इतर पाच मित्रांना बोलावले आणि मुलीला निर्जनस्थळी नेऊन सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी मुलीसमोर अट ठेवली की तिने तिच्या मैत्रिणीला बोलावले तरच ते तिला सोडतील. पीडितेने घाबरून तिच्या मैत्रिणीलाही बोलावले, त्यानंतर 6 गुन्हेगारांनी तिच्यावरही बलात्कार केला.
सामूहिक बलात्कारानंतर गुन्हेगार दोन पीडित मुलींना धमकावून तेथून निघून गेले. त्यानंतर मुलींनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची तक्रार केली. हे प्रकरण उघडकीस येताच पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी छापा टाकून पाच गुन्हेगारांना अटक केली. सहाव्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून पुढील तपास सुरु आहे.




