मुंबई : वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी. पुरातत्व विभाग, मंदिर आणि मूर्ती संवर्धन विषयातील तज्ञ यांचे मत तसेच वारकरी संप्रदायाच्या भावना या बाबींची सांगड घालून उपाययोजना कराव्यात. यासाठी पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल येत्या 5 मे पर्यंत सादर करावा, अशा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
यावर्षी 17 हजार कोटींचा महसूल जमा, राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17177.19 कोटी रूपयांचा महसूल जमा केला आहे. विभागाने सन 2020-21 यावर्षी 15078.25 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. सन 2020-21 यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात 13.92 टक्के वाढ झाल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्यात मद्य निर्मिती, घाऊक विक्री, किरकोळ विक्री इ. […]
महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार, आरोपीला अटक
भंडारा : धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. साकोली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणात राजेश ईश्वर मडावी (वय 19) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश नागपूर येथे फिरायला जाण्याचा बहाण्याने […]
दिलासादायक! पुण्यात मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस काका/दिदी यांची नेमणूक, जाणून घ्या सविस्तर…
पुणे : पुणे शहरातील शाळांमधील बालके, लहान मुले, कॉलेजमधील व अन्य प्रशिक्षण संस्थेतील, आश्रमशाळेतील अथवा तत्सम संस्थेतील मुले-मुली यांची सुरक्षा व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस काका/दिदी यांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त शाळेत न जाणारी बालके, निराश्रीत, निराधार, रस्त्यावरुन किंवा निर्जन ठिकाणी एकटी-दुकटी फिरणारी लहान मुले, बालके यांच्या समस्या, सुरक्षा याबाबतचे कामसुध्दा पोलीस काका/दिदी पाहतील. […]
समलिंगी जोडप्याच्या लग्नाला मान्यता नाकारली, न्यायालयाने फेटाळली ‘त्या’ दोघींची याचिका…
एका समलिंगी जोडप्याने गेल्या आठवड्यात त्यांच्या लग्नाला मान्यता मिळावी यासाठी न्यायालयात याचिका केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली आहे. आपल्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी एका आईने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर निकाल देताना न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी हा निर्णय दिला होता, या याचिकेत दुसऱ्या महिलेने जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे मुलीला ताब्यात […]
पुष्पा फिव्हर! आता चिंपांझीने केली श्रीवल्ली स्टेप्सची कॉपी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होऊन 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी त्याचा ‘फिव्हर’ अजूनही लोकांच्या मनातून उतरलेला नाही. अल्लू अर्जुनची स्टाइल आणि स्टेप्स कॉपी केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयात बंद असलेला एक चिंपांझी ‘श्रीवल्ली स्टेप्स’ची कॉपी करत असल्यासारखे चालतो आहे. एका […]
बीटेकच्या विद्यार्थ्याची महाविद्यालयात चाकूने भोसकून हत्या, आरोपींना अटक
लखनौ : एमआयईटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी सकाळी एका बीटेकच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना सुरक्षारक्षकांनी पकडले. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस स्टेशन परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बागपतच्या बरौत भागातील शिकोहपूर गावात राहणारा निखिल तोमर मेरठमधील एमआयईटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेक […]
पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर हल्ला, कोयत्याने हातावर वार करून लुटले
पुणे : पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर हल्ला झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मोटार सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी डिलिव्हरी बॉयवर हल्ला करून त्याला लुटले. ही घटना निकमार कॉलेज हॉस्टेल, बालेवाडीचे गेट नं. 2 जवळ रस्त्यावर काल (१२ एप्रिल) दुपारी २. २० वाजता घडली. याप्रकरणी डिलिव्हरी बॉयने पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या […]
फ्रीजने पेट घेतल्याने वाड्याला आग लागली, अरुंद रस्त्यामुळे बचावकार्यात अडथळे…
आळंदी : खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथे घरातील फ्रीजने पेट घेतल्याने संपूर्ण वाड्याला आग लागली. ही दुर्घटना मंगळवारी (१२ एप्रिल) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. यात वाड्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत जवळपास तीन सिलिंडरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, माउलींच्या मंदिरापासून जवळच जुन्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था इमारतीजवळ असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर धर्मशाळाजवळ राहणाऱ्या मुकुंद […]
पुणे : सध्या तडीपार असलेला कुख्यात गुंड घातक हत्यारासह पोलिसांच्या ताब्यात
पुणे : सध्या पुणे शहर व जिल्ह्यांमधून तडीपार असलेला गुंड अजिंक्य काळे हा प्राणघातक शस्त्र घेवुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्यासाठी आंबेगाव पठार येथे आला असता त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना […]










