selling an eight month old girl 4 arrested incident in virar

पुणे : सध्या तडीपार असलेला कुख्यात गुंड घातक हत्यारासह पोलिसांच्या ताब्यात

पुणे महाराष्ट्र

पुणे : सध्या पुणे शहर व जिल्ह्यांमधून तडीपार असलेला गुंड अजिंक्य काळे हा प्राणघातक शस्त्र घेवुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्यासाठी आंबेगाव पठार येथे आला असता त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना त्यांना बातमीदाराकडुन खबर मिळाली की, कुख्यात सुरज ठोंबरे टोळीतील व सध्या पुणे शहर व जिल्ह्यांमधून तडीपार असलेला गुंड अजिंक्य काळे हा प्राणघातक शस्त्र घेवुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्यासाठी आंबेगाव पठार, गणेशनगर याठिकाणी येणार आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी सदर ठिकाणी सापळा लावला असता तेथे संशयीत गुंड कोयत्यासारखे हत्यार घेवुन आला. त्याला पोलीसांनी हटकले त्यावेळी तो पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी पोलीस अमंलदार नामदेव रेणुसे यांनी झडप टाकुन अजिंक्य संतोष काळे (वय २१, रा आंबेगाव पठार, सर्वे नंबर २४, गणेशनगर, पुणे) याला ताब्यात घेतले आहे.

त्यावेळी त्याच्या ताब्यातुन एक कोयत्या सारखे घातक शस्त्र जप्त करण्यात आलेले आहे. पुढील कारवाईसाठी त्यास भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे यांच्या ताब्यात दिलेले आहे. परिमंडळ 2 पुणे शहरचे पोलीस उप आयुक्त सागर पाटील यांनी त्यांच्याकडील हद्दपार आदेशान्वये पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय परिक्षेत्र व पुणे जिल्ह्यातून अजिंक्य काळे यास दोन वर्षासाठी तडीपार केलेले आहे. त्याचवेळी त्यांच्या टोळीतील टोळी प्रमुख यश प्रशांतसिंग साहोता (वय-२१) याच्यासह टोळीतील सदस्य दिपक किसन तोरणकर (वय-२३), आकाश बापु म्हस्के (वय -२४), निखील सखाराम आखाडे (वय-२६), ओंकार श्रीनाथ कटके (वय-२६), जयेश शिवलाल परमार (वय – १९), स्वप्निल उत्तम उबाळे (वय-२०) सर्व रा. आंबेगाव पठार, मोहननगर, पुणे या टोळीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये तडीपार केलेले आहे. गुंड अजिंक्य काळे याच्याविरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे येथे दरोडा, गंभीर दुखापत, तोडफोडी सारखे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदशनाखाली युनिट-2, गुन्हे शाखेचे पेालीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, राजेंद्र पाटोळे, सपोफो यशवंत आंब्रो, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, अस्लम पठाण, निखील जाधव, मोहसिन शेख, नागेश राख यांनी केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत