The young man killed his own mother and burned her body in the yard
क्राईम ठाणे महाराष्ट्र

धक्कादायक! सासऱ्याने 42 वर्षीय सुनेवर झाडली गोळी, वेळेवर नाश्ता न दिल्याने केले भयंकर कृत्य…

ठाणे : ठाण्यातील राबोडी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. राबोडी येथील 76 वर्षीय काशिनाथ पाटील यांनी गुरुवारी सकाळी आपल्या 42 वर्षीय सुनेवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. सासऱ्याला वेळेवर नाश्ता न दिल्याने त्याला राग आला आणि त्याने थेट सुनेच्या पोटात गोळी झाडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काशिनाथ पाटील यांचा वाळूचा व्यवसाय आहे. सीमा राजेंद्र पाटील (वय 42) असे मृत महिलेचे नाव असून ती एका 17 वर्षीय मुलाची आई आहे. गुरुवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  सकाळी त्या सर्वांसाठी नाश्ता बनवत होत्या. वेळेवर नाश्ता न दिल्याने सासऱ्याला राग अनावर झाला आणि सून समोर येताच त्याने सुनेवर गोळी झाडली. या घटनेत महिलेच्या पोटात गोळी लागली. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा ठाणे राबोडी पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

दरम्यान, घटनेच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरीच होते. कुटुंबीयांनी महिलेला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आरोपीकडे परवाना असलेली बंदूक असून, सुनेवर गोळीबार करून त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथके तयार केली असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत