The Taiwanese delegation met Industry Minister Subhash Desai
महाराष्ट्र मुंबई

तैवानच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट

मुंबई : तैवान येथील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी आर्थिक, राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात डॉ. मुमीन चेन, पीटर चेन, डॉ. चिन्स्टन वँग, जेन चुन टैसाई, इ टी चॅँग आदी उपस्थित होते. ‘तैपई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर इन इंडिया’च्यावतीने या बैठकीचे आय़ोजन करण्यात आले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारत आणि तैवान दरम्यान अनेक वर्षांपासूनचे सौहर्दाचे संबंध आहेत. अनेक क्षेत्रात दोन्ही देश हातात हात घालून काम करीत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यास मुबलक संधी आहे. गुंतवणुकदारांसाठी उद्योग विभागाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तैवानने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणुक वाढवावी. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स निर्मिती, इलेक्ट्रॉनिक वाहन निर्मिती, तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहनही देसाई यांनी यावेळी केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत