कोरोनाच्या थैमानामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र, बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार, असा प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालकांना पडलेला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणूसह नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस परिस्थिती पाहू आणि त्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात विचार करु. सीबीएसईने जसं परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. तशाच पद्धतीने आम्ही १५ एप्रिलनंतर १२वी बोर्डाची परीक्षा घेण्याचा आणि १ मे नंतर दहावी बोर्डाची परीक्षा घेण्याच्या संदर्भात विचार करत आहोत”.




