आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं म्हणत बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे […]
टॅग: shivsena
संजय राऊत आज लिलावती रूग्णालयात दाखल होणार, उद्या होणार अँजिओप्लास्टी
शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. एक वर्षापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु त्रास वाढू लागल्यानं त्यांना पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. लिलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू आणि डॉ. मेनन राऊत […]
उर्मिला मातोंडकर आणि शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर माझ्या शुभेच्छा – प्रितम मुंडे
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान उर्मिला मातोंडकरच्या शिवेसना प्रवेशावरुन भाजपा खासदार प्रितम मुंडे यांनी टोला लगावला आहे. उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा असं त्या म्हणाल्या आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. “माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला काँग्रेस पक्षाकडून त्यांनी नशीब आजमावून पाहिलं. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांचं आणि […]
मुख्यमंत्र्यांची भाषा नाक्यावर होणाऱ्या भांडणांसारखी, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र […]
‘यात कसली मर्दानगी’ म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाजपचा पलटवार
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे मारले आहेत. मुंबई आणि ठाण्यातील ठिकाणांवर झाडाझडती घेतली जात आहे. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र व निवासी संकुलांशी संबंधित विविध प्रकल्पांत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहे. प्रताप सरनाईक घरी नाहीत हे पाहून धाड टाकलीये. ही नामर्दानगी आहे, असा गंभीर आरोप […]
त्यांच्या सोबत्त सत्तेत बसलात, तेव्हाच “भगव्याचा” रंग तुम्हीच फिका केलात
भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा? त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशी जळजळीत टीका फडणवीसांनी शिवसेनेवर केली होती. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनीही महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘105 हुताम्यांवर ज्यांनी […]
शिवसेनेकडून कम्युनिटी फ्रिजची सुविधा, अन्नदान करण्याचे शिवसेना आमदाराकडून आवाहन
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गरजूंना मदत करण्यासाठी कम्युनिटी फ्रिजची संकल्पना सुरु केली होती. त्यानंतर आता शिवसेनेकडून कम्युनिटी फ्रिजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबईतील माझगाव येथे बाप्टिस्टा उद्यानाबरोबरच शिवसेना शाखा 209 मध्ये हा उपक्रम आता सुरु झाला आहे. येत्या काही दिवसांत भायखळ्यात आणखी आठ ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते, […]
महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही; पण बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता : संजय राऊत
मुंबई: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होऊ शकतो, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणले कि, […]
शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत शिवसेनेवर बोचरी टीका..
मुंबई : बिहार निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेने लढविलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेला ‘शवसेना’ म्हटले आहे. तसंच शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारल्याचा टोला हाणला आहे. महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असेल […]
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा या केवळ अफवा- महेश कोठे
सोलापूर : शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी भाजपमध्ये जाणार अशा अफवा पसरवून माझं शिवसेनेचं तिकीट कट करण्याचं षडयंत्र यापूर्वी रचलं गेलं होतं. त्याच पद्धतीचे षडयंत्र आता पुन्हा माझ्याबाबतीत रचले जात आहे, असा खुलासा कोठेंनी केला. मी शिवसेनेत नाराज जरूर आहे. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश […]










