Ashish shelar criticize shivsena
महाराष्ट्र

त्यांच्या सोबत्त सत्तेत बसलात, तेव्हाच “भगव्याचा” रंग तुम्हीच फिका केलात

भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा? त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशी जळजळीत टीका फडणवीसांनी शिवसेनेवर केली होती. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनीही महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘105 हुताम्यांवर ज्यांनी गोळीबार केला. कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली. याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला. ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्र लुटला. त्यांच्या सोबत्त सत्तेत बसलात. तेव्हाच “भगव्याचा” रंग तुम्हीच फिका केलात. भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात’, अशा शब्दात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं.

‘भ्रष्टाचाराला कंटाळून मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची. विकासाची गुढी उभारतील. गुढीला “शुध्द भगव्याची” झालर चढवतील..! तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा. मुंबईकरांना चँलेज देताय. मुंबईकरच आता “करुन दाखवतील”!’असं ट्वीट करुन मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपची भूमिकाही शेलार यांनी स्पष्ट केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत