Punjab's famous singer Sardul Sikander dies
मनोरंजन

ब्रेकिंग : प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन

पंजाबचे प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदुल सिकंदर बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात किडनीच्या समस्येने ग्रस्त झाल्यानंतर सिकंदर यांना रुग्णालयात दाखल […]

Actress Jayashree Ramaiah dies in suspicious circumstances
मनोरंजन

ब्रेकिंग : जयश्री रमैया या अभिनेत्रीचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू

कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नड स्पर्धक जयश्री रमैया यांचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला आहे. आज (25 जानेवारी) जयश्रीचा मृतदेह बंगळुरूमधील पुनर्वसन केंद्रात लटकलेल्या अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार ही अभिनेत्री नैराश्याने ग्रासलेली होती. जयश्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण कन्नड इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी जयश्रीने सोशल मीडियावरही अशी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यानंतर ती […]

Former cricketer Vijay Shirke dies due to corona
क्रीडा

माजी क्रिकेटपटू विजय शिर्के यांचं कोरोनामुळे निधन

सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र आणि मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू विजय शिर्के यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विजय शिर्के हे ८० च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळायचे. सचिनने ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सचिनने म्हटलं आहे, मी 15 वर्षाचा असल्यापासून विजय शिर्के […]

Former MP Mohan Rawale dies
महाराष्ट्र मुंबई

माजी खासदार मोहन रावले यांचं निधन, ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी होती ओळख

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं गोव्यात निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले हे दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. रावले यांना गोव्यात हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. अत्यंत साधी राहणी असणाऱ्या रावले यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात […]

Senior RSS leader dies in road accident
देश

RSS च्या ज्येष्ठ नेत्याचा रोड अपघातात मृत्यू

बंटवाल : आज (मंगळवार) पहाटे झालेल्या रोड अपघातात आरएसएसचे ज्येष्ठ नेते व्यंकटरामन होला (वय 60) यांचा मृत्यू झाला. पुट्टूर ट्रॅफिक पोलिस स्टेशनच्या हद्दीत कबक्काजवळ पोल्यात हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ते मंगळुरुच्या आरएसएस विभागात ग्रामीण विकास प्रमुख म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी व्यंकटरामन हे पुत्तूर येथून आरएसएसची बैठक संपवून आपल्या दुचाकीवरून बीसी रोडच्या अग्रबाईल […]

BJP MLA Kiran Maheshwari
देश

भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन

राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आमदार किरण माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते. त्या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार ठरल्या आहेत, ज्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आमदार किरण माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. त्यांच्याकडे कोटा उत्तर महापालिका […]

Famous Argentine footballer Diego Maradona
क्रीडा

अर्जेंटिनाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन

अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच एका अपघातामुळे मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती. त्यानंतर मॅरेडोना यांना त्यांच्या मुलीच्या घरी हलवण्यात आलं होतं. ३० ऑक्टोबर रोजी मॅरेडोना यांनी आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. १९८६ साली आपल्या […]

Bollywood actor Faraz Khan
मनोरंजन

बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन

बॉलिवूड अभिनेता फराज खानने वयाच्या ४६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फराज खान बंगळूरु येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पण त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अभिनेत्री पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करा अशी विनंती केली होती. त्यानंतर सलमान खानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली असल्याचे […]

BJP leader Dr. Jagannath Dhone
महाराष्ट्र

भाजप नेते डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी 12:30 वाजता पातूर येथील डॉ. वंदनाताई ढोणे स्मृतिस्थळ येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ते गेली अनेक वर्षे वेगळ्या विदर्भाची चळवळ हाती घेऊन लढा देत होते. डॉ. जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यासोबत त्यांनी राजकारणातही आपली ओळख निर्माण केली […]

Dean Jones dies
क्रीडा ग्लोबल

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले कि  डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले कि आम्ही त्याच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव […]