Senior RSS leader dies in road accident

RSS च्या ज्येष्ठ नेत्याचा रोड अपघातात मृत्यू

देश

बंटवाल : आज (मंगळवार) पहाटे झालेल्या रोड अपघातात आरएसएसचे ज्येष्ठ नेते व्यंकटरामन होला (वय 60) यांचा मृत्यू झाला. पुट्टूर ट्रॅफिक पोलिस स्टेशनच्या हद्दीत कबक्काजवळ पोल्यात हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ते मंगळुरुच्या आरएसएस विभागात ग्रामीण विकास प्रमुख म्हणून कार्यरत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंगळवारी सकाळी व्यंकटरामन हे पुत्तूर येथून आरएसएसची बैठक संपवून आपल्या दुचाकीवरून बीसी रोडच्या अग्रबाईल येथे आपल्या घरी परतत होते. त्यावेळी त्यांना पोलिया येथे अपघात झाला. ते प्रवास करीत असलेल्या दुचाकीची बॅरिकेडला धडक बसल्याचे समजले.

आरएसएस कार्यकर्ता म्हणून तारुण्यापासून ओळखले जाणारे व्यंकटरामन यांनी संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांचे लक्ष वेधले. ते विद्यमान भाजप अध्यक्ष नलिनकुमार कतील यांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या निवासस्थानीच नलिन यांनी संघाबद्दलचे शिक्षण घेतले. ग्रामीण विकास समितीचे मंगलोर विभागीय समन्वयक म्हणून व्यंकटरामन होल्ला यांनी अनेक ठिकाणी तरुणांना स्वावलंबी होण्यासाठी नोकरीविषयक प्रशिक्षण दिले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत