पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलाने सुसाट गाडी चालविल्याने पिंपरी चिंचवडमध्ये एक थरारक अपघात झाला. याचप्रकरणी आता या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. सोबतच सर्व्हिसिंग सेंटरवरील एका व्यक्तीस देखील अटक झाली आहे, त्याने गाडीची चावी या अल्पवयीन मुलाला दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांचे नाव तानाजी शिंदे तर सर्व्हिसिंग सेंटरवरील व्यक्तीचे आकाश बोडके असे […]
टॅग: crime
दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोघांनी केली 15 वर्षीय भाजीविक्रेत्याची निर्घृण हत्या
नवी दिल्ली : दिल्लीतील नोयडामध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. भाजीच्या हातगाडीचा दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन दुचाकीस्वारांनी 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ग्रेट नोयडा परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हा मुलगा गरीब परिस्थितीमुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाजा विकण्याचे काम करत होता. तो भाजी विकण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरात आला होता. यावेळी […]
धक्कादायक : रेल्वे स्थानक परिसरात २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला २२ वर्षीय असून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या परिसरात राहते. आपल्या कुटुंबासोबत तिचा वाद झाल्यानंतर ती रागाने घरातून निघून आली आणि रेल्वे स्थानकात बसली होती. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले […]
बालसुधारगृहात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांची गळफास घेऊन आत्महत्या
बुलडाणा : चोरीच्या गुन्ह्यात बालसुधारगृहात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलडाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृह/बालसुधार गृह आहे. येथे दोन अल्पवयीन गुन्हेगारांनी शनिवारी (6 डिसेंबर) पहाटे 4 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन अल्पवयीन आरोपींना बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव येथे 10 दिवसांपूर्वी चोरी केल्याच्या गुन्ह्याखाली पकडले होते. […]
ठाणे शहरात कुत्र्याला मारहाण करुन जिवंत जाळले
ठाणे शहरात एका कुत्र्याला मारहाण करुन जिवंत पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ परिसरात असलेल्या किंगकॉंग नगर येथे ही घटना घडली आहे. ललित मलिक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ धीरज संतोष रेड्डी (वय 26) याला अटक केली असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर […]
पोलीस अधिकाऱ्याशी जीवघेणं वर्तन; बोनेटवर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास
पिंपरी चिचंवड : महाराष्ट्र पोलिसांवरील हल्ले काही कमी होताना दिसेनात. आज पोलीस अधिकाऱ्याशीच जीवघेणं वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. गाडी रोखणाऱ्या वाहतूक पोलिसास एका चालकाने बोनेटवर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडिओदेखील समोर आला आहे. वाहतूक पोलिसांनी गाडी रोखण्याचा प्रयत्न केला पण तरीदेखील कार चालकाने गाडी थांबवली नाही. […]
गुरुग्राममध्ये २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
गुरुग्राम : एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. गुरुग्रामधील डीएलएफ फेज २ परिसरातील एका रियल इस्टेट डीलरच्या कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार करतेवेळी या महिलेस अमानुष मारहाण देखील केली गेली. यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या […]







