मुंबई : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते व्हेंटिलेटवर होते. श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले होते. त्यातच हृदयाशी संबंधित समस्या […]
टॅग: corona
देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती, सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून लक्ष घालत चिंता व्यक्त केली आहे. देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती उद्भवल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, लॉकडाऊन आणि औषधांचा पुरवठा या चार मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं कि, या राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सरकारनं काय […]
कोरोनाचा विस्फोट!, एकाच रूग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना पॉझिटिव्ह
पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण […]
ब्रेकिंग : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. ए. के. वालिया यांचे कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात सामान्य जनतेपासून ते नेतेमंडळी कोरोना विषाणूच्या विळख्यात येत आहेत. भारतात दररोज २,००० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री डॉ. एके वालिया यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रूग्णालयात उपचार […]
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. ते म्हणाले कि, “माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने माझ्यावर उपचार सुरू आहेत. अलिकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सावधगिरी बाळगा आणि चाचण्या करून घ्या.” तसेच त्यांनी सर्व खबरदारी घेऊन शिक्षण मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे […]
धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण
रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांना उपचारासाठी झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धोनीच्या आई-वडिलांना रांचीमधील बरियातू रोड येथील पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. […]
कोरोनाची दुसरी लाट केव्हा ओसरणार? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत…
पुणे : कोरोनाची दुसरी लाट केव्हा ओसरणार? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये सातत्याने येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी १५ दिवस ते एक महिन्यामध्ये ही लाट उतरणीला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, त्यासाठी सर्वसामान्यांनी सर्व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करायला हवे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. राज्याच्या मृत्युदर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी आतापर्यंत आलेल्या कोरोना […]
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग करोना पॉझिटिव्ह; एम्स रूग्णालयात दाखल…
दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. Dear Dr. Manmohan Singh Ji, Wishing you a speedy recovery. India needs your guidance and advice in this difficult time. — Rahul Gandhi […]
मोठा निर्णय : RTPCR चाचणी निगेटिव्ह परंतु कोरोनाची लक्षणे असल्यास तो कोरोना रुग्णच…
उत्तर प्रदेश : कोरोनाचे वाढते रूग्ण आणि आरटीपीसीआर चाचणी सतत नकारात्मक येऊन देखील वाढणारा कोरोना संसर्ग या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली आणि जर त्याला कोरोनाची लक्षणं जाणवत असतील तर त्याच्यावर कोरोना पेशंटप्रमाणे उपचार होतील आणि त्याला प्रिझ्मटिव्ह कोविड […]
अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण
अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. सोनूने म्हटले आहे कि, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही, उलट, आपल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, मी नेहमीच तुमच्याबरोबर […]










