नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. ते म्हणाले कि, “माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने माझ्यावर उपचार सुरू आहेत. अलिकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सावधगिरी बाळगा आणि चाचण्या करून घ्या.”
तसेच त्यांनी सर्व खबरदारी घेऊन शिक्षण मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे सुरू राहिल असेही सांगितले आहे.
All the work of @EduMinOfIndia is being conducted normally observing necessary precautions.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) April 21, 2021




