Oxygen Tank Leakage In Nashik Corporation Hospital

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून गळती; 22 जणांचा मृत्यू

नाशिक महाराष्ट्र

नाशिक : नाशिकमधील महानगरपालिकेच्या जाकीर हुसैन या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर मृतांचा आकडा वाढला असून 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नाशिक शहरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या जाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना काही वेळापूर्वी समोर आली. यावेळी महापालिकेच्या जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये १३१ रुग्ण उपचार घेत होते. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयातून अतिरिक्त साठा मागवण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन टँकमधून होणारी गळती थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ऑक्सिजन ज्यावेळी टँकरमधून टाकीत भरला जात होता त्यावेळी ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये सध्या १३१ रुग्ण उपचार घेत होते. १७० बेडचं हे हॉस्पिटल असून त्यामध्ये १७ बेड हे व्हेंटिलेटर होते. सहा ते सात लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. नुकतंच दहा सिलेंडर सिव्हिल हॉस्पिटलमधून या रुग्णालयात आणण्यात आले असून तातडीने त्याची जोडणी पूर्ण करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत