रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. एका कंटेनरने मागच्या बाजूने […]
टॅग: अपघात
ब्रेकिंग : जालन्यात कार विहिरीत कोसळून भीषण अपघात, आईसह चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
जालना : औरंगाबादहून शेगावला जाणारी कार विहिरीत कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात आईसह चार वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीतील इतर 3 जणांना वाचवण्यात यश मिळालं आहे. औरंगाबादहून शेगावला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत विहिरीत कोसळली. […]
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागांव गावच्या हद्दीत अतिशय भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. भरधाव वेगाने जाणार्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार (क्र. एम.एच. 07 ए.बी. 5610) ही […]
रत्नागिरीत बस दरीत कोसळून भीषण अपघात, बसमध्ये 27 प्रवासी
रत्नागिरी : कशेडी घाटात खाजगी बस 50 फुट दरीत कोसळून आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे. बसमधील 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घाटात 50 फुट खोल दरीत कोसळली. या […]
माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला भीषण अपघात, अझरुद्दीन थोडक्यात बचावले
जयपूर : माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांचा राजस्थानातील सवाई माधोपूर येथे अपघात झाला. या अपघातात मोहम्मद अझरुद्दीन यांची गाडी पलटली. लालसोट कोटा मेगा हायवेवरील सुरवाल पोलिस ठाण्याजवळ हा अपघात झाला. मोहम्मद अझरुद्दीन या अपघातातून थोडक्यात बचावले. माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्या धावत्या कारचा टायर निखळल्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यात […]
थरारक अपघात : अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देणं वडिलांना पडलं महागात, दोन जणांना अटक
पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलाने सुसाट गाडी चालविल्याने पिंपरी चिंचवडमध्ये एक थरारक अपघात झाला. याचप्रकरणी आता या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. सोबतच सर्व्हिसिंग सेंटरवरील एका व्यक्तीस देखील अटक झाली आहे, त्याने गाडीची चावी या अल्पवयीन मुलाला दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांचे नाव तानाजी शिंदे तर सर्व्हिसिंग सेंटरवरील व्यक्तीचे आकाश बोडके असे […]
आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
अंबरनाथ: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले असून आमदार किसन कथोरे यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. आमदार किसन कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून बदलापूरच्या दिशेने चालले असता वाहुली गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने आमदार किसन […]
केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले; त्याच्या हेलिकॉप्टरला अपघात
पाटणा : केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे विमानतळावर घडली. उतरत असताना पाटणा विमानतळावर तारेच्या कुंपणाला हेलिकॉप्टरच्या पंख्याचा स्पर्श झाला. यामुळे हेलिकॉप्टरच्या पंख्याचे पाते तुटले. या अपघातातून रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले, ते सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि संजय झा होते. […]








