Accident in Kasara ghat : कसारा घाटात पहाटेच्या सुमारास ट्रक आणि आयशरचा भीषण अपघात झाला आहे. धबधबा पॉईंटजवळ केळ्याने भरलेल्या ट्रकने आयशरला मागच्या बाजूने धडक दिली. या दुर्घटनेत ट्रक पलटी झाल्याने ट्रक चालक पप्पू यादव यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रकचालकाचा मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य […]
टॅग: अपघात
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाचवले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण..
परळी : बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. बीड वरून परळी कडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे […]
भीषण अपघात! कारने पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत
छत्तीसगड : छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे गुरुवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला. राजनांदगाव खैरागड मार्गावरील सिंगारपूर गावाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत कारने अचानक पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील ५ जण जिवंत जळून खाक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालोद जिल्ह्यातील लग्न समारंभात सहभागी होऊन हे कुटुंब खैरागडला परतत होते. […]
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक राईडिंग करत होता. त्यावेळी तो खाली पडला आणि जवळपास 15 मिटरपेक्षा जास्त जमिनीवर घासून पुढे गेला. ‘सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड’ नं दिलेल्या वृत्तानुसार शेन वॉर्नला दुखापत झाली असून बराच त्रास देखील होत आहे. या अपघातानंतर वॉर्नला आपला पाय मोडला असल्याची भीती वाटत होती. […]
भीषण अपघात! ट्रकचालक करत होता ओरल सेक्स, एका महिलेचा मृत्यू तर…
अमेरिका : कॅलिफोर्निया राज्यातील सॅन जोस शहरात एका ट्रक चालकावर एका महिलेचा खून करून दोन जण गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या ट्रकचा चालक ट्रकमध्ये एका २४ वर्षीय तरुणीसोबत ओरल सेक्स करत होता, त्यावेळी हा भीषण अपघात झाला. तसेच तो नशेत देखील होता. या अपघातात एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर […]
घाटात वळणाचा अंदाज न आल्यामुळे कार संरक्षक कठड्यावरुन खाली गेली, पण…
सातारा : वाईहून पाचगणीला जाणाऱ्या कारला पसरणी घाटात अपघात झाला. परंतु, यावेळी मोठा अनर्थ टळला. घाटातील वळण चालकाच्या लक्षात न आल्यामुळे कार रस्त्याच्या संरक्षक कठड्यावरुन खाली गेली. परंतु, काही फूट अंतरावर गेल्यानंतर कार एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. नाहीतर ही कार तीन-चारशे फूट खोल दरीत कोसळली असती. या कारसह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मिळालेल्या […]
भीषण अपघात! अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
जळगाव : ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिनही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या फुलगाव फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ आज (२५ मे) दुपारी घडली. या अपघातात विवेक सुनील पाटील (वय १७), देवानंद सोपान पाटील (वय १६) आणि तुषार राजेंद्र […]
कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास वाहन चालक जबाबदार नाही
मुंबई : दादर कोर्टाने रस्ते अपघातांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. रस्त्यावर पायी चालणाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एखादा अपघात झाल्यास त्यासाठी कार चालकास जबाबदार धरता येणार नाही, असे कोर्टाचे नमूद केले आहे. दंडाधिकारी कोर्टाचे न्यायाधीश प्रवीण पी. देशमाने म्हणाले, रस्त्यावर चालताना किंवा रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगणे हे एका पादचारी (पायी चालणाऱ्या) व्यक्तीचे कर्तव्य आहे. पादचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एखादा अपघात […]
खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एका खासगी बसचा अतिशय भीषण अपघात झाला आहे. चंबा येथील तीसामध्ये प्रवाशांनी भरलेली खासगी बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी ७ मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हा अपघात सकाळी १० च्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले […]
पुणे-नाशिक महामार्गावर गोमांस वाहून नेणाऱ्या पीकअपला अपघात
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात डोळासणे येथे पुणे-नाशिक महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या पीकअपला सकाळी अपघात झाला. या पीकअपमध्ये बेकायदेशीररीत्या गोमांस वाहून नेले जात असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप महामार्गावर उलटली. दरम्यान, पिकअपचा (एम एच ४७ ई २७६०) चालक फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत पीकअप आणि महामार्गावर विखुरलेले मांस बाजूला घेण्याचे […]










