नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात डोळासणे येथे पुणे-नाशिक महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या पीकअपला सकाळी अपघात झाला. या पीकअपमध्ये बेकायदेशीररीत्या गोमांस वाहून नेले जात असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप महामार्गावर उलटली. दरम्यान, पिकअपचा (एम एच ४७ ई २७६०) चालक फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत पीकअप आणि महामार्गावर विखुरलेले मांस बाजूला घेण्याचे काम सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास दीड ते दोन तास ठप्प होती. पिकअपचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून घारगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.




