रत्नागिरी : कशेडी घाटात खाजगी बस 50 फुट दरीत कोसळून आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे. बसमधील 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घाटात 50 फुट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 27 प्रवासी होते. त्यापैकी 25 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर एक वृद्ध बसमध्ये अडकून आहे. वाचवण्यात आलेल्या 25 जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.