Bengaluru vs Kolkata and Delhi vs Punjab

IPL डबल हेडर : आज दुपारी बेंगलुरु आणि कोलकाता यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना

क्रीडा

IPL २०२१ डबल हेडर : IPL २०२१ च्या पहिल्या डबल हेडरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर हा सामना होईल. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मागील दोन्ही सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2 पैकी 1 सामना जिंकला आणि 1 गमावला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांनी 2 पैकी 1 सामना जिंकला आणि 1 गमावला आहे. या दोन्ही संघांची फलंदाजी खूपच मजबूत आहे. आतापर्यंत दिल्ली आणि पंजाब यांच्यात आयपीएलमध्ये एकूण 26 मॅच खेळल्या गेल्या आहेत. त्यापैकी पंजाबने 15 आणि दिल्लीने 11 सामने जिंकले.

खेळपट्टीचा अहवाल :

चेपकची खेळपट्टी स्पिनर्सला उपयुक्त ठरली आहे. या मोसमात फिरकी गोलंदाजांनी या मैदानावर 26 बळी घेतले आहेत. या मैदानावर या हंगामात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत. त्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने 4 सामने जिंकले तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ १ सामना जिंकला.

वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. 2019 मध्ये वानखेडे येथे 7 सामने खेळले गेले. यापैकी 3 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 185 च्या वर धावा केल्या. दिल्ली कॅपिटलचा संघ अधिक आक्रमकपणे खेळत आहे आणि येथील खेळपट्टी त्यांच्या खेळाडूंच्या फलंदाजीला अधिक अनुकूल ठरेल, अशी शक्यता आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत