नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट बैठकीत कोरोना लसीकरणाबाबत अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही आवाहन करतो की, सर्वांनी लगेच नोंदणी करावी आणि लसीकरण करुन घ्यावं. तसेच देशात लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोरोना लसीची कोणताही तुटवडा भासणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.




