जयललिता यांचा बायोपिक असलेला चित्रपट ‘थलाईवी’ चा ट्रेलर आज रिलीज झाला. कंगनाच्या वाढदिवसानिमित्ताने ट्रेलर रिलीज करुन तिने आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. यामध्ये कंगनाने घेतलेली मेहनत आणि हटके अंदाज दिसून येत आहे.
तीन मिनिटे 22 सेकंदचा हा ट्रेलर असून जयललिता यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून नावाजणं, त्यानंतर देशातील सर्वात प्रभावी राजकारणी म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. कंगनाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून जयललिता यांच्यासारखे दिसण्यासाठी 20 किलो वजनही वाढवले आहे.
थलाईवी चित्रपट येत्या 23 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा बायोपिक चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शक ए. एल. विजय आहेत तर विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर. सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
#ThalaiviTrailer @vishinduri @thearvindswami @ShaaileshRSingh @BrindaPrasad1 @neeta_lulla #HiteshThakkar #RajatArora @ZeeStudios_ #GothicEntertainment @Thalaivithefilm Official Trailer (Hindi) | Kangana Ranaut | Arvind Swamy | Vi… https://t.co/c5ZRyU5ZJp via @YouTube
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 23, 2021




