farooq abdullah

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावर कारवाई

देश

श्रीनगर : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची सुमारे १२ कोटींची संपत्ती संलग्न केली आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मधील आर्थिक गडबडीच्या प्रकरणात फारूक अब्दुल्ला यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. संलग्न मालमत्तांमध्ये फारूक अब्दुल्लाच्या तीन घरांचा समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ईडीनुसार २००५ ते २०११ दरम्यान जेकेसीएला बीसीसीआयकडून एकूण १०. ७८ कोटी रुपये मिळाले. 2006 ते जानेवारी 2012 दरम्यान फारूक अब्दुल्ला JKCA चे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. त्यांनी अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक केली आणि लॉन्ड्रिंगच्या उद्देशाने त्यांना आर्थिक अधिकार दिले.

फारुख अब्दुल्ला यांच्या संलग्न केलेल्या प्रॉपर्टीमधील एक घर श्रीनगर मधील गुपकर रोड येथे आहे. दुसर्‍यामध्ये तनमार्गच्या कटीपोरा तहसीलचा समावेश आहे आणि तिसरे जम्मूच्या भाटिंडी येथील घर आहे. या व्यतिरिक्त श्रीनगरच्या पॉश रेसिडेन्सी रोड भागातील व्यावसायिक मालमत्तेचाही समावेश आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत