IND vs AUS: fracture in Mohammed Shami's hand

IND vs AUS : भारतीय संघाला धक्का, मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर

क्रीडा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. आता भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने त्याला उर्वरित तीन कसोटी सामन्यांतून वगळण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अॅडलेड येथे शनिवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजीदरम्यान पॅट कमिन्सचा उसळता चेंडू शमीच्या उजव्या हातावर जोरात आदळला होता. त्याला आपला हात वर उचलनंही अवघड झालं होतं. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं.

सुत्रांच्या माहितीनुसार, शमीच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने त्याला प्रचंड वेदना होत होत्या. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली याने शमीला खूपच वेदना होत असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आल्याचंही तो म्हणाला होता. हाताच्या दुखापतीचे स्वरुप बघता मोहम्मद शमी पुढील तीन टेस्टमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करू शकणार नाही. पूर्ण विश्रांती घेतली तरच त्याची दुखापत बरी होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत