The house of the accused who raped a 3-year-old girl was demolished
देश

3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ आरोपीचे घर पाडण्यात आले, प्रशासनाकडून कारवाई…

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या खासगी शाळेच्या बस चालकाचे घर पाडण्यात आले आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभाग, पोलीस आणि महापालिकेने संयुक्त कारवाई करताना ही कारवाई केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शाहपुरा परिसरातील वसंत कुंज कॉलनीजवळील टाकीसमोरील बागेच्या जागेवर आरोपी चालकाने अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे घर बांधले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर बालिकेवरील बलात्कार प्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई करण्याबरोबरच जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. घर तोडण्यापूर्वी चालकाच्या कुटुंबीयांना घर रिकामे करण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील बिलाबंग या प्रतिष्ठित शाळेतील 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली. स्कूल बसच्या ड्रायव्हरने नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केला.

मुलगी शाळेतून परतली तेव्हा तिच्या आईने पाहिले की कोणीतरी तिच्या बॅगेत ठेवलेल्या अतिरिक्त सेटमधील मुलीचे कपडे बदलले आहे. यानंतर आईने आपल्या मुलीच्या वर्गशिक्षिका आणि शाळेच्या मुख्याध्यापकांकडे चौकशी केली, मात्र दोघांनीही मुलीचे कपडे बदलले नसल्याचे सांगितले. दरम्यान, पीडित चिमुकलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेतले आणि तिचे समुपदेशन केले, त्यानंतर तिने सांगितले की बस चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिचे कपडे देखील बदलले.

देश हादरला! 3 वर्षीय चिमुकलीवर स्कूल बसमध्ये बलात्कार, महिला सहाय्यकही होती उपस्थित…

मुंबईत खळबळ! अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत तरुणीवर तीन वर्षे बलात्कार, स्वयंभू धर्मगुरूचे घृणास्पद कृत्य

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत