कृषी कायद्याविरोधात देशात सुरु असणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय़ घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक मोर्चाही काढला. ही एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम 144 लागू करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, गुलाम नबी आझाद आणि अधिररंजन चौधरी यांना आंदोलनाची, राष्ट्रपतींच्या भेटीची परवानगी होती. पण, काँग्रेस मुख्यालयात जमणाऱ्या खासदारांचा अंदाज पाहता पोलिसांनी या भागात कलम 144 लागू केलं. पोलिसांनी काँग्रेस आंदोलनाच्या धर्तीवर सदर भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. आंदोलनकर्ते काँग्रेस खासदार विजय चौकमध्येच थांबणार होते. पण, त्यांना मुख्यालयातच थांबवण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस खासदारांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. ज्यानंतर काही खासदारांसह प्रियंका गांधींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.