strengthen the immunity of children all these things will help you

लहान मुलांसाठी प्रतिकारशक्तीच ठरेल संरक्षक, त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास ‘या’ गोष्टी करतील मदत

तब्येत पाणी देश लाइफ स्टाइल

लहान मुलांमध्येही आता कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. हे लक्षात घेता, आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत, जेणेकरुन मुलांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून वाचवता येईल. परंतु, केवळ इतकेच पुरेसे ठरणार नाही. या कठीण काळामध्ये मुलांची योग्य ती काळजी घेण्याबाबत पालकांची मोठी जबाबदारी आहे, जेणेकरुन त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील. ज्यामध्ये पौष्टिक आहार मोठी भूमिका बजावतो. चला तर जाणून घेऊया, मुलांची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी त्यांच्या आहारात काय समाविष्ट केले पाहिजे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अन्नामध्ये रंगीबेरंगी पदार्थांचा समावेश :
येथे रंगीबेरंगी म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि फळे. त्यामध्ये सूक्ष्म पोषक घटक (micronutrients) आणि अँटीऑक्सिडेंट असतात. दिवसाची सुरुवात सफरचंद खाऊन करणे चांगले ठरेल. न्याहारीमध्ये अंडी, केळी, उपमा, इडली, पोहे अशा गोष्टी देऊ शकता. लहान मुलांना दिवसातून एक ते दोन फळं द्या. या सर्व गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने अगदी योग्य आहेत आणि यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते.

हळद-दूध :
हळद घातलेले दूध प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम तर करतेच, त्याबरोबर मुलांना संसर्ग होण्यापासून देखील वाचवते. दिवसातून एकदा नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी त्यांना हळद-दूध पिण्यास द्या.

स्नॅक्समध्ये सुका मेवा खा :
स्नॅक्समध्ये तेलकट, चरबीयुक्त पदार्थांऐवजी काजू, बदाम, मनुके, अक्रोड आणि सूर्यफूलाच्या बिया अशा गोष्टी खाऊ घाला. त्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे एक महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडेंट आहे. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

जेवणाची वेळ नियमित ठेवा :
चांगले आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच, लठ्ठपणा आणि इतर आजारांपासून दूर रहाण्यासाठी जेवणाची वेळ ठरवून घ्या. असे केल्यामुळे आपण अनावश्यक काहीही खाणे टाळाल. खाल्ल्यानंतर लगेच झोपायला जाऊ नका.

प्रो-बायोटिक्स समृद्ध अन्न :
मुलांना केळी, कांदा, लसूण, दही, ताक यासारख्या गोष्टी द्या. यामध्ये चांगले बॅक्टेरिया (good bacteria) असतात. ते आतड्यांद्वारे रक्तामध्ये जाणाऱ्या हानिकारक जीवाणूंना कमी करतात.

पॅकिंग पदार्थ खाणे टाळा :याबरोबरच पॅकिंग केलेले पदार्थ खाण्याची सवय बदला, कारण त्यात संतृप्त फॅटी ऍसिडस् (saturated fatty acid), साखर आणि मीठ जास्त असते. तसेच त्यात अनेक प्रकारचे कृत्रिम रंगही मिसळलेले असतात, जे मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत