Works under regional tourism development in Raigad district should be completed speedily - Women and Child Development Minister Aditi Tatkare

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावीत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महाराष्ट्र

मुंबई : रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध विकास कामे सुरू असून यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे. ही कामे विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

श्रीवर्धन मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकास कामांबाबत मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टमोड, पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्ज्वला दांडेकर, उपवनसंरक्षक (रोहा) अप्पासाहेब निकत, मुख्याधिकारी (म्हसळा) विठ्ठल राठोड आदी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, रायगड पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि पर्यटन संचालनालय यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक पर्यटनाच्या विकास कामांना गती द्यावी.

दिवेआगार येथे कासव संवर्धन प्रकल्प उभारणे, पर्यटन मार्केट सुविधा तयार करणे, तळा महादेव तलाव परिसराची पर्यटनदृष्ट्या सुधारणा करणे, मोरबा येथील गाव तलावाचे सुशोभीकरण करणे, रोहा नगरपरिषद हद्दीतील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे, श्रीवर्धन समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर सुशोभीकरण करणे, रोहा येथील ग्रामपंचायत पाटण – सई हद्दीतील कामे, जोगेश्वरी मंदिर परिसर सुशोभीकरण, मौजे नागोठाणे येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुरातन निवासस्थान सुशोभीकरण, रोहा नगरपरिषद हद्दीतील हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरण, तळघर येथील तलावाचे संवर्धन करणे अशी रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत सन २०२१-२२ मधील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध ४४ कोटी ७९ लाख रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करावेत.

श्रीवर्धन शहरातील पर्यटक निवासी इमारतींचे नूतनीकरण, तलाव कुंडाचे नूतनीकरण,म्हसळा येथील जानसई नदी सुशोभीकरण कामे, श्रीवर्धन येथील मंदिर विकासाची कामे, रोहा नगरपरिषद हद्दीतील शिवसृष्टी परिसर सुशोभीकरण, रोहा येथे शिवसृष्टी शिल्प तयार करणे, तळा येथील कुडा लेणी येथे पर्यटनाच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे, अशी सन 2022 -23 मधील बारा कामे १२ कोटी ५१ लाखांची असून सर्व यंत्रणांनी हे कामे गतीने पूर्ण करावेत, असेही निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत