doctors and police will be vaccinated first - Health Minister Rajesh Tope

कुणी कितीही मागणी करो; पहिली लस हि याच लोकांना; आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट

महाराष्ट्र

कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. हे लॉबिंग करणाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग केली तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचं काम सुरू आहे. या यादीत नाव यावं म्हणून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत आहेत असाही आरोप होत आहे. या सगळ्यावर राजेश टोपे यांनी सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना लस देणार असं म्हटलं आहे.

राज्य सरकारच्या निकषांनुसार राजकारणी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या कक्षेत येत नाहीत. मात्र आम्ही दररोज सामान्य लोकांना भेटतो त्यामुळे आम्ही देखी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांमध्ये येतो. सोबतच कुटुंबातील सदस्यांचाही समावेश केला जावा. तसेच सर्वात आधी करोना लस देण्यात येणाऱ्या कोरोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यादीत आपलं आणि कुटुबीयांची नावं समाविष्ट करण्यासाठी राजकारणी व काही अधिकारी दबाव टाकत आहेत, अशी माहिती जिल्हा व नागरी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत