Prevention of online sexual exploitation of children is everyone's responsibility - Women and Child Development Minister Aditi Tatkare
महाराष्ट्र मुंबई

ऑनलाईन माध्यमातून होणारे बालकांचे लैंगिक शोषण रोखणे सर्वांची जबाबदारी

मुंबई : लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना इंटरनेटमुळे जगभरातल्या ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. परंतु लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारे मुलांचे लैंगिक शोषण रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड […]

Women and Child Development Minister Aditi Tatkare's directive to publish information about child policy on the website
महाराष्ट्र

बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वसमावेशक असे ‘बालधोरण’ महिला व बालविकास विभाग तयार करीत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या. मंत्रालयातील दालनात बालधोरण मसुद्याच्या सादरीकरणावेळी सूचना करताना मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास […]

Aditi Tatkare, Minister of Women and Child Development
महाराष्ट्र

‘वन स्टॉप सेंटर’ योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घ्यावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : देशातील अन्य राज्यात ‘वन स्टॉप सेंटर’ या योजनेच्या केलेल्या अंमलबजावणीची माहिती घ्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात राज्यातील वन स्टॉप सेंटर स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री कु.तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, स्वयंप्रेरणा ग्रामीण महिला संघटनेचे अध्यक्ष ॲड. शाहू काटकर […]

The pilot project launched for women's savings groups should be accelerated - Women and Child Development Minister Aditi Tatkare
महाराष्ट्र

महिला बचतगटांसाठी सुरु केलेल्या पथदर्शी प्रकल्पास गती द्यावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकसित करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता लोरियल इंडिया आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सातारा, नाशिक आणि रायगड येथे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम गतीने करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लोरियल इंडिया यांच्या प्रतिनिधींसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत […]

To raise the standard of living of beggars a project will be set up on the lines of Ahmednagar - Women and Child Development Minister Aditi Tatkare
महाराष्ट्र

भिक्षेकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगरच्या धर्तीवर प्रकल्प उभारणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे, या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात अन्यत्र प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी यासाठी विभागाने पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने […]

Women and Child Development Minister Aditi Tatkare
महाराष्ट्र

महिला घरेलू कामगारांच्या प्रश्नावर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : महिला घरेलू कामगारांची नोंदणी करणे, वेतन विषयक विविध प्रश्न, जनश्री विमा योजना लागू करणे या विविध प्रश्नांसाठी कामगार विभाग यांच्या समन्वयातून महिला घरेलू कामगारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार समन्वय समितीची बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. […]

Works under regional tourism development in Raigad district should be completed speedily - Women and Child Development Minister Aditi Tatkare
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावीत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध विकास कामे सुरू असून यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे. ही कामे विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. श्रीवर्धन मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकास कामांबाबत मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी […]

Women and Child Development Minister Aditi Tatkare
महाराष्ट्र

‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रमातून महिलांविषयक गुन्हेगारीला बसेल प्रतिबंध – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वातावरणात आपला विकास करता आला पाहिजे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी समाज प्रबोधन देखील काळाची गरज आहे. महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाचा ‘यंग इंडिया अनचेन्ड’ हा उपक्रम संपूर्ण मुंबईतील ३० विविध महाविद्यालयात सुरू होणार आहे, या उपक्रमाची महानगरपालिका, जिल्हा आणि तालुकास्तरावर व्याप्ती वाढवावी, असे […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र

मानवी तस्करी रोखण्यासाठी ‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई : मानवी तस्करी रोखण्यासाठी युवकांना गुन्हेगारी विश्वाबाबत जागरुक करत, महाविद्यालय स्तरावर तस्करीविरोधी क्लबची स्थापना करण्याचा ‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रम राज्य महिला आयोग आणि अलायन्स अगेन्स्ट सेंटर ऑफ ट्राफिकिंग (ऍक्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. आज (५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता […]

Women and Child Development Minister Aditi Tatkare visited Umarkhadi and children's home
महाराष्ट्र

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट

मुंबई : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डोंगरी येथील उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट देवून पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. बालकांचे समुपदेशन करताना भेटायला येणाऱ्या पालकांचे समुपदेशन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. येथील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या. यावेळी त्यांनी बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, अन्न […]