Women and Child Development Minister Aditi Tatkare's directive to publish information about child policy on the website
महाराष्ट्र

बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वसमावेशक असे ‘बालधोरण’ महिला व बालविकास विभाग तयार करीत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंत्रालयातील दालनात बालधोरण मसुद्याच्या सादरीकरणावेळी सूचना करताना मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सह आयुक्त राहुल मोरे यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, बालधोरणात बालकांच्या अनुषंगाने काम करणाऱ्या सर्व विभागांना याबाबतची माहिती पाठविण्यात यावी. माहिती संकेस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर विभागाने यामध्ये जनतेकडून आलेल्या सूचना व हरकतींवरही तातडीने कार्यवाही करावी. बालकांचा आहार, सुरक्षितता, शिक्षण व आरोग्य, हक्क, ग्रामीण व शहरी भागातील बालके यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक समाज घटकातील बालके आणि सर्व संस्था यांची देखील मते विचारात घ्यावीत. या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत