coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik

मुंबईत डेल्टा प्लसमुळे पहिला मृत्यू, कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेऊनही महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : मुंबईत डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिलेने कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या या महिलेचा मृत्यू झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला असून मुंबईत डेल्टा प्लसने झालेला हा पहिला मृत्यू आहे. मधुमेहासह अन्य आजारांमुळे गुंगागुंत वाढत जाऊन या महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत बुधवारी डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळले होते. त्यात या महिलेचा समावेश होता, अशी माहिती मिळाली आहे. संबधित महिलेने कोरोनावरील लसचे दोन्ही डोस घेतले होते. या महिलेला कोरडा खोकला, अंगदुखीचा त्रास होत होता, तसेच तोंडाची चवही गेली होती. त्यानंतर कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू होते.

या महिलेला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते आणि रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स देण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे जीनोम सीक्वेन्सिंगमध्ये स्पष्ट झाले आहे. डेल्टा प्लसचा हा राज्यातील दुसरा मृत्यू ठरला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत