पुणे : अजित पवार आपल्या वेळेच्या तंतोतंत नियोजनामुळे ओळखले जातात, अजित पवार पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी सकाळी सहा वाजता पोहोचले त्यांनी पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला.
यावेळी अजित पवार हे मेट्रो चालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. पाहणी दौऱ्यात मोजके पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते. मेट्रो संदर्भात अजित पवार यांनी काही सूचना देखील केल्या असून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.




