दिल्ली : अकाली दलाच्या महत्त्वाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यामुळे एनडीएमध्ये मोठी खळबळ माजली आहे. संसदेत आणलेल्या कृषी संबंधी विधेयकाच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
I have resigned from Union Cabinet in protest against anti-farmer ordinances and legislation. Proud to stand with farmers as their daughter & sister.
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) September 17, 2020
हरसिमरत कौर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा ट्विटरवरुन केली आहे. यासंबंधी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, शेतकरीविरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांसोबत त्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत उभं राहण्याचा मला अभिमान वाटतो.




