मुंबई : राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठाणे, नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून सूचना दिल्या. […]
टॅग: Deputy Chief Minister
तुझ्या जिद्दीला सलाम! अजित पवार यांच्याकडून वैभवी संतोष देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गुण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीने मिळविलेल्या यशाने तिच्या अंगभूत गुण, हुशारी, धैर्य, संयम, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचे सांगून तिच्या यशाने महाराष्ट्राला आनंद […]
हे तर चॅम्पियन बजेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचा योग्य तो संतुलन राखणार हे चॅम्पियन बजेट उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मांडले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या अर्थसंकल्पाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या अडीच वर्षांपासून विकासाची घोडदौड सुरू असून महाराष्ट्र आता थांबणार नाही हा […]
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना ई-मेल, यंत्रणा अलर्ट मोडवर
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल पोलिसांना आला असून, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून अशा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिस या अज्ञात व्यक्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरेगाव पोलीस स्टेशन, जेजे मार्ग […]
गृहखात्याऐवजी शिवसेनेला मिळणार ‘हे’ महत्वाचं खातं? एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई : एकनाथ शिंदे हे आज आझाद मैदानावरील महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील, अशी माहिती आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा वर्षा बंगल्यावर शिंदेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, ते गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. वारंवार महायुतीच्या नेत्यांच्या बैठका होत होत्या. मात्र, शपथविधीच्या आदल्या दिवशीपर्यंत कोणताच तोडगा निघत नव्हता. याबाबत अजूनही अनेक तर्क-वितर्क […]
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व […]
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, […]
सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, दि. 29 : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी.असे बजावतानाच पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस भवन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. […]
सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी, परदेशी आणि सहकारी बँकांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत मॅको बँकेनेही टिकून राहिले पाहिजे. नागरिकांना आधुनिक सेवासुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. सर्व बँकांच्या पदाधिकारी आणि सभासदांनी काम करीत असतांना जागरुक राहणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दि महाराष्ट्र […]
महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बालेत होते. […]