Deputy Chief Minister Eknath Shinde offered comfort while interacting with tourists from Maharashtra stranded in Nepal.
महाराष्ट्र मुंबई

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

मुंबई : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यटकांना दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्यातील सुमारे १५० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून त्यातील काहींशी आज रात्री उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. नेपाळमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांच्या समूहाशी संवाद साधत त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला.

राज्यातील मुरबाड तालुक्यातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकले असून त्यांच्याशी देखील शिंदे यांनी मोबाईलवरून संवाद साधला आणि त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत