Samsung Galaxy A02 कंपनीच्या मागील वर्षी आलेल्या गॅलेक्सी ए०१ चे अपग्रेड मॉडल असणार आहे. नुकतेच या फोनला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर पाहिले गेले आहे. गॅलेक्सी ए सीरीजच्या या नवीन फोनमध्ये कंपनी अँड्रॉयड १० वर आधारीत सॅमसंग एवयूआय देवू शकते.
फोनची वैशिष्ट्ये : सॅमसंग गॅलेक्सी ए०१ स्मार्टफोमध्ये ५.७ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले मिळू शकतो.
- २ जीबी रॅम
- १६ जीबी इंटरनल स्टोरेज, स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता
- गॅलेक्सी ए०१ अँड्रॉयड ९ पाय आधारित सॅमसंग वन यूआय वर काम करतो.
- ड्यूल रियर कॅमेरा आणि सिंगल फ्रंट कॅमेरा
- रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा
- सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
- फोनला पॉवर देण्यासाठी 3,000mAh ची बॅटरी




