Stamp duty cut boosts construction sector, boosts state economy - Balasaheb Thorat

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण

अहमदनगर महाराष्ट्र

अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून गुरुवारी रात्री ही माहिती दिली. सध्या राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असतानाच अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांनी मास्क वापरावा व आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.

नगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तनुपरे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत