Change in traffic for 3 months as Metro work underway in Pune

पुण्यात मेट्रोचे काम सुरु असल्याने 3 महिन्यांसाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या…

पुणे महाराष्ट्र

पुणे : पुणे शहरातील येरवडा वाहतुक विभागाच्या हद्दीत महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पेारेशन लि. यांच्यातर्फे सिव्हील कोर्ट ते रामवाडी दरम्यान पुणे मेट्रो रिच-3 या मार्गिकेवर एन. एम. चव्हाण चौक ते ऍडलॅब चौकादरम्यान महा मेट्रोचे रेल्वे स्टेशनचे काम सुरु आहे. ऍडलॅब चौकामध्ये गर्डर टाकण्याच्या कामाकरता 27 मे 2022 ते 26 ऑगस्ट 2022 पर्यत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ऍडलॅब चौकामध्ये वाहतुकीत खालीलप्रमाणे तात्पुरते बदल

  • बिशप स्कुलकडुन एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्ड ऍडलॅब चौकातुन उजवीकडे वळून कल्याणीनगर लेन नं. 3 येथुन डावीकडे वळुन एन. एम. चव्हाण चौकाकडे जाईल.
  • ए.बी.सी. चौकाकडुन येणारी वाहतूक ऍडलॅब चौकातून सरळ रामवाडी अंडरपास या ठिकाणी जाईल.

तसेच पर्णकुटी चौकामध्ये मेट्रोचे गर्डर टाकण्याच्या कामाकरता 27 मे 2022 ते 26 जुलै 2022 पर्यत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. सदरचे आदेश राहुल श्रीरामे, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे शहर यांनी दिले आहेत.

पर्णकुटी चौकामध्ये वाहतुकीत खालीलप्रमाणे तात्पुरते बदल 

  • सादलबाबा चौकाकडुन येवुन पर्णकुटी चौकातुन कोरेगांव पार्ककडे जाणाऱ्या वाहतूकीस पर्णकुटी चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदरची वाहतूक सादलबाबा चौक, तारेश्वर चौक पुढे सरळ गुंजन चौक येथे यु टर्न घेऊन पर्णकुटी चौकातुन डावीकडे वळून इच्छितस्थळी जाईल.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत