DCC's 30th Anniversary Blood Donation Camp Concluded

डीसीसीच्या ३०व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

पुणे महाराष्ट्र

पुणे : संगणक क्षेत्रातील डेटा केअर कॉर्पोरेशनच्या ३०वा वर्धापन दिन व कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अनिल म्हस्के यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डीसीसी आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जेएम रोडला आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात १५० जणांनी सहभाग घेतला यामध्ये १०१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. यावेळी दत्ता खाडे सरचिटणीस – भाजप, अनिल पायगुडे- सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, प्रशांत कोरेगावकर- संचालक, हॉटेल ऋतुगंध, संदिप मोरे – सरचिटणीस काँग्रेस, शरद मुलमुले – संचालक, संचालन, जिवन कदम- संचालक पी.आर, राजेश नवले, पी.आर यादी उपस्थित होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सामान्य कुटुंबातील अनिल म्हस्के यांनी सन १९९२ साली पुण्यात छोट्याशा जागेत डीसीसीची स्थापना केली होती. ग्राहकसेवा हीच ईश्वरसेवा मानून कष्ट आणि सचोटीच्या जोरावर डीसीसीने सध्या सहाशेहुन अधिक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर हजारो ग्राहकांचे जाळे निर्माण केले असून दररोज करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. डीसीसीच्या महाराष्ट्रात ८ शाखा व २८ रिटेल्स असून पॅन इंडियात देखील पदार्पण केले आहे.

समाजातील सामान्य घटकातील लोकांचा त्यांना कळवळा असून आयटी क्षेत्रातील धनदांडग्यांची मक्तेदारी मोडीत काढून म्हस्के यांनी स्वखर्चाने सर्व सामान्यांना डिलरशिप देऊ केली. करोडो रुपयांची जोखीम पत्करून असंख्य गरीब लोकांना व्यवसायात उभे केले, याचा त्यांना सर्वात जास्त आनंद आहे. डीसीसीने सर्वसामान्य कुटुंबातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या दिल्या, तसेच डीलरच्या मार्फत असंख्य लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

पोलिसांना रेनकोट, वारकऱ्यांना-निराधारांना ब्लँकेट वाटप, अंध शाळेतील मुलांना मदत, अनाथ मुलांना दिवाळीत फराळ वाटप अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम डीसीसीकडून वेळोवेळी राबवले जातात. कोरोनानंतर रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे हे लक्षात घेऊन म्हस्के यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त व डीसीसीच्या वर्धापन दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन केले होते. त्यानिमित्त अनेकांनी शुभेच्छा म्हणून रक्तदान केले.

सह्याद्री हॉस्पिटल डेक्कनच्या जनसंपर्क अधिकारी सुजाता नाईक यावेळी म्हणाल्या कि, “दिवाळी असल्याने १० दिवस रक्तदान करण्यासाठी कॅम्प झालेला नसल्याने रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. त्यामुळे आजच्या रक्तदान शिबिरामुळे मोलाची मदत मिळाली. हॉस्पिटलमधील रुग्णांना तात्काळ फायदा होईल आणि हे रक्त लगेच रुग्णांना देण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी डेटा केअर कॉर्पोरेशन या कंपनीची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, अशा सदिच्छा देखील दिल्या.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत