पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. सर्व ४२ प्रवासी सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात शिवशाही (यवतमाळ ते पुणे) बसला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.




