Recruitment for 322 posts in Reserve Bank of India

RBI मध्ये वैद्यकीय सल्लागार पदावर भरती

काम-धंदा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आस्थापनेत भरती निघाली आहे. याअंतर्गत वैद्यकीय सल्लागार पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यात येत आहे. आरबीआयतर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी मिळणारा पगार, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जदाराकडे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असणे गरजेचे आहे. अर्जदाराला कोणत्याही रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिशनर म्हणून औषधोपचार करण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा. त्याचे स्वतःचे क्लिनिक / दवाखाना किंवा राहण्याची जागा बँकेच्या कोणत्याही दवाखान्याच्या १० ते १५ कि.मी.च्या अंतरात असावी. वैद्यकीय सल्लागाराचे मानधन हे प्रत्यक्ष कामाच्या तासांवर ठरेल. वैद्यकीय सल्लागार पदाचा कालावधी हा तीन वर्षांसाठी असेल. करार पूर्ण झाल्यावर नूतनीकरण होणार नाही.

अर्जदाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यातील पात्रता, निकष समजून घेऊन अर्ज भरावा. ओबीसी, एससी, एसटी उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरताना सोबत कास्ट सर्टिफिकेटची प्रत जोडणे आवश्यक आहे. आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांनी देखील संबंधित कागदपत्र अर्जासोबत जोडावी. दिलेल्या नमुन्यात अर्ज नसल्यास तो रद्द करण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ ऑगस्ट २०२१

अर्ज करण्यासाठी पत्ता :
प्रादेशिक संचालक,
मानव संसाधन व्यवस्थापन विभाग,
आरबीआय, मुख्य कार्यालय इमारत,
डॉ. राघवेंद्र राव रोड, सिव्हिल लाईन्स,
पोस्ट बॉक्स नं- १५, नागपूर,
पिनकोड- ४४०००१

नोटिफिकेशवर जाण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत