Dr. Manasvi Jadhav-Warekar

डॉ. मनस्वी जाधव-वरेकर ठरल्या मिसेस ब्रेव अँड ब्युटीफुल मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र

पुणे महाराष्ट्र

पुणे : मेडिक्वीन मेडिको पिजंट तर्फे डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर यांच्याकडून मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिला डॉक्टरांसाठी सौन्दर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे दुसरे पर्व होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे ३०० महिला डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. त्यातून ४० स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले. या स्पर्धकांमधून ६ विजेते घोषित करण्यात आले. कोल्हापूरच्या डॉ. मनस्वी जाधव-वरेकर यांना मिसेस ब्रेव अँड ब्युटीफुल मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र हा किताब मिळाला. पुण्यातील बालेवाडी येथील ऑर्किड हॉटेल मध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, डॉ. कांचन मदार, डॉ. मीनाक्षी देसाई, डॉ. अश्विनी पाटील, पूजा वाघ मिस इंडिया इंटरनॅशनल दुबई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या समन्वयक म्हणून प्राजक्ता शहा यांनी काम पाहिले. योगेश पवार यांनी कोरीओग्राफर म्हणून काम पाहिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रेरणा बेरी – कालेकर म्हणाल्या कि, मेडिक्वीन हि केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून यामध्ये सहभागी डॉक्टरांचा सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रातील काम, कलागुण, फिटनेस, छंद , वैयक्तिक कामगिरी या अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. “निरामया”, प्रत्येक स्री आरोग्यपूर्ण हा उद्देश घेऊन सर्व सहभागी डॉक्टर काम करतात.

डॉ. मनस्वी जाधव-वरेकर या नंतर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “मॉडेलिंग किंवा अभिनय क्षेत्रात न जाता टायटल चा उपयोग वैद्य म्हणून आरोग्य सेवा देत, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर काम करेन. तसेच ग्रामीण भागातील ७०% बेरोजगार महिलांसाठी रोजगाराच्या संधीवर काम करण्याचा मानस आहे.

डॉ. मनस्वी जाधव-वरेकर या पुणे आणि कोल्हापूर येथे आयुर्वेदिक सल्लागार, गर्भ संस्कार तज्ञ, अग्नी विद्धा तज्ञ, पंचकर्म तज्ञ तसेच प्रिव्हेंटिव्ह कार्डियॉलॉजिस्ट म्हणून काम पाहतात. त्यांनी यापूर्वी हृदयरोग, डायबेटीस, सांधेदुखी तसेच गर्भधारनेच्या समस्यांबाबत सेमिनार आयोजित केले आहेत. तसेच कोल्हापूर आणि सांगली येथील महापुराच्या वेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे देखील घेतले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत