7 boys gang raped 10 year old girl in gurugram six accused are minors

नात्याला काळिमा! जन्मदात्या वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

क्राईम नाशिक महाराष्ट्र

नाशिक : जन्मदात्या वडिलांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वडिलांकडून होणाऱ्या सततच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने अखेर ‘११२’ क्रमांक डायल केला आणि हा संतापजनक प्रकार समोर आला. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिंचोंडी खुर्द शिवारात ही घटना घडली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने ११२ या हेल्पलाइनवर घरात भांडण झाले असून आम्हाला मदत द्या असा कॉल केला. मात्र, पोलीस पीडितेने सांगितलेल्या घराच्या पत्त्यावर पोहोचले असता तो पत्ता वेगळाच निघाला. यानंतर ग्रामीण पोलिसांना या कॉलचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळाले. पोलिसांनी जीपीएसद्वारे या टॉवर लोकेशनला ट्रैक करत पीडित मुलीचे घर शोधून काढले. पोलिसांनी मुलीला माहिती विचारली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती. त्यानंतर महिला पोलिसांनी तिला धीर देत चौकशी केली. तेव्हा पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या पीडित मुलीने सांगितले की तिचे वडील तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करतात.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने येवला पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी पीडितेच्या गावात जाऊन गुरुवारी संध्याकाळी तिच्या वडिलांना अटक केली. पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे की तिच्या वडिलांनी ती घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिला जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

येवला शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कार, पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाला केवळ डायल ११२’ या आधुनिक सेवेमुळे वाचा फुटली. यामुळे अत्यंत आपत्तीजनक व आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी पोलीस मदत मिळविण्यासाठी १०० ऐवजी ११२ हा क्रमांक फिरवावा, जेणेकरून पोलिसांना अचूक लोकेशन मिळते आणि तत्काळ मदत देणे सोपे होते, असे आवाहन सचिन पाटील यांनी नाशिक शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत