corona booster dose
देश

ब्रेकिंग! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना आता खाजगी लसीकरण केंद्रांवर सावधगिरीचा डोस उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, खाजगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिलपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सावधगिरीचे डोस उपलब्ध होतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोग्य मंत्रालयाने निवेदनात स्पष्ट केले आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर असावे. दरम्यान, सरकारी लसीकरण केंद्रांमार्फत सुरू असलेला मोफत लसीकरण कार्यक्रम पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी तसेच खबरदारी डोससाठी सुरू राहणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत