Rahul Gandhi Twitter : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ट्विट हटवलं होतं. पण त्यानंतर त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं होतं.
Shri @RahulGandhi’s Twitter account has been temporarily suspended & due process is being followed for its restoration.
Until then, he will stay connected with you all through his other SM platforms & continue to raise his voice for our people & fight for their cause. Jai Hind!
— Congress (@INCIndia) August 7, 2021
एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं फोटोवर आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पीडितेच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वकील विनीत जिंदल यांनी केली होती.
दरम्यान, काही वेळानंतर राहुल गांधींच ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं. पण ते नेमकं सस्पेंड का करण्यात आलं होतं याची चर्चा आता सुरू झाली आहे. काँग्रेसकडून ट्विटरला उत्तर पाठविण्यात आल्यानंतर राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले आहे.




